Thursday, 14 January 2016

SAHIL FEORATE SONG LYRICS

दूर दूर चालली आज माझी  सावली !


पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे

उठला हा जाळ आतून करपल रान रे
उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान
डोळ्यातल्या  पाण्याने हि भिजेना तहान  

दूर दूर चालली आज माझी  सावली.........२
कशी सांज हि उरी गोठली
उरलो हरलो दुखः झाले  सोबती .............२

काय  मी बोलून गेलो  श्वास माझा थांबला
मी इथे अन तो तिथे हा  खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला  घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा
आपुलाच तो रस्ता जुना.......२  मी एकटा चालू किती
उरलो हरलो दुखः झाले  सोबती .............२

लाभतो सारा  दिलासा  कोणता  केला  गुन्हा
जिंकुनी  हि खेळ सारा हारते मी का पुन्हा
त्रास लाखो भास लाखो कोणते मानू खरे
उरण्या   त्या पावसाचे घाव मनावर का चढे

समजावतो मी या मना..............२
तरी आसवे का वाहती
उरलो   हरलो दुखः झाले  सोबती .............२    

---------------------------------------------------------------------------------------------------------

मला वेड लागले प्रेमाचे ...


रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे

नादावला, धुंदावला, कधी गुंतला जीव बावरा
नकळे कसा कोणामुळे सूर लागला मनमोकळा
हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला, कुणी भेटले माझे मला
खुलता कळी उमलून, हा मनमोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे




------------------------------------------------------------------------------------------------------------

माझ्या डोळ्यात काजळ.... !


माझ्या डोळ्यात काजळ
माझ्या केसात गजरा

माझ्या डोळ्यात काजळ लई  गया रे
माझ्या केसात गजरा लई गया रे.............२
चोरी चोरी मी आले तुम्हा भेटाया
पण मन मारू  बीज कोणी लई  गया रे

पायी पैजण  नि बाजूबंद दंडावर
शुक्रतार्र्यांची बिंदी माथ्यावर
भरी वरची मी  भासे जणू अप्सरा
आओ मैफिल को इंद्रसभा लागी गया रे

माझ्या डोळ्यात काजळ
माझ्या केसात गजरा
माझ्या डोळ्यात काजळ लई  गया रे
माझ्या केसात गजरा लई गया रे.............२
चोरी चोरी मी आले तुम्हा भेटाया
पण मन मारू  बीज कोणी लई  गया रे










------------------------------------------------------------------------------------------------------------

चिंब भिजलेले....!


या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती

सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा
उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे

ओढ जागे राजसा रे अंतरी सूख बोले
सप्‍तरंगी पाखरू हे इंद्रधनू बघ आले
लाट ही वादळी मोहुनी गाते
ही मिठी लाडकी भोवरा होते
पडसाद भावनांचे, रे बंध ना कुणाचे
दाही दिशांत गाणे बेधुंद प्रीतीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे

हे फूल आले, पंख आले, रूप हे सुखाचे
रोमरोमी जागले दीप बघ स्वप्‍नांचे
बरसतो मोगरा थेंब गंधाचे
भर्जरी वेड हे ताल छंदांचे
घन व्याकूळ रिमझिमणारा
मन-अंतर दरवळणारा
ही स्वर्गसुखाची दारे, हे गीत प्रीतीचे

चिंब भिजलेले, रूप सजलेले
बरसूनी आले रंग प्रीतीचे

--------------------------------------------------------------------------------------------------------

सावर रे ए मना....!


सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची
 वाट हळवी वेचताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे
सावळ्या क्षणांचे, भरून आल्या घनांचे
थेंब ओले झेलताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

भान उरले ना जगाचे ना स्वतःचे
सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे
फितूर झाले रातदिन तू सावर रे
सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे
येतील आता आपुले ऋतू
बघ स्वप्न हेच खरे
पालवीच्या सणांचे, दिवस हे चांदण्यांचे
पानगळ ही सोसताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

स्पर्श होता आत लाखो आर्जवांची झुंबरे
स्वप्न हे माझे तुझे अन पापण्यांचे उंबरे
जाईल आता आस ही उतू बघ रातही सरे
पावसाच्या खुणांचे, दिवस हे पैंजणांचे
मी हवेतून चालताना, सावर रे ए मना , सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

बहरताना बावरले, सुख जरासे आवरले
तोल माझा खोल जाई, सावर रे

----------------------------------------------------------------------------------------------------------