MARATHI SONGS LYRICS

 

------------------------------------------------------------------------------------------------------------

देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही


देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
सांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही देवा कुठं शोधू तुला मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा 


देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू 

का कधी कुठे स्वप्न विरले, प्रेम हरले 

स्वप्न माझे आज नव्याने खुलले
अर्थ सारे स्पर्शाने उलगडले

आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी 

का रे तडफड ही ह्या काळजा मधी
घुसमट तुझी रे होते का कधी
माणसाचा तू जल्म घे, डाव जो मांडला मोडू दे 

का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे
उत्तरांना प्रश्न कसे हे पडले
अंतरांचे अंतर कसे ना कळले 

देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू 

गीतकार : मंदार चोळकर, 
संगीतकार : अमितराज, 
गायक : आदर्श शिंदे - कीर्ती किल्लेदार - आनंदी जोशी, 
गीत संग्रह / चित्रपट : दुनियादारी (२०१३)

------------------------------------------------------------------------------------------------------------टिक टिक वाजते डोक्यात


टिक टिक वाजते डोक्यात
धड धड वाढते ठोक्यात
कभी जमीन कधी नभी, संपते अंतर झोक्यात



नाही जरी सरी तरी भिजते अंग पाण्याने
सोचू तुम्हें पलभर भी बरसे सावन जोमाने
शिंपल्यांचे शो-पीस नको
जीव अडकला मोत्यात
टिक टिक …

सूर ही तू, ताल ही तू
रुठे जो चांद वो नूर है तू
आसु ही तू हसू ही तू
ओढ मनाची नि हूरहुर तू
रोज नवे भास तुझे, वाढते अंतर श्वासात
टिक टिक …

गीतकार : मंगेश कांगणे,
 संगीतकार : पंकज पडघन,
गायक : सोनू निगम - सायली पंकज,
चित्रपट  : दुनियादारी (२०१३)





------------------------------------------------------------------------------------------------------------

 .आभास हा छळतो तुला....


कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कसा सावरू मी, आवरू गं मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला

कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जीवा
कशी सावरू मी, आवरू रे मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला

क्षणात सारे उधाण वारे, झुळूक होऊन जाती
कधी दूर तूही, कधी जवळ वाटे, पण काहीच नाही हाती
मी अशीच हासते, उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला पाहते, तुझ्याचसाठी सजते
तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस खरा कसा रे
तू इथेच बस ना, हळूच हस ना, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू
नवे रंग सारे, नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला.

Movie or Album: Yanda kartavya Aahe 
Singer(s): Vaishali Samant, Rahul Vaidya
Music Director(s): Nilesh Mohrir
Lyricist(s): Ashwini Shende  
------------------------------------------------------------------------------------------------------------

अरे मनमोहना


अरे मनमोहना
कळली देवा तुला, राधिका रे राधिका
कळली राधिका रे, कळल्या गोपिका
साधी भोळी मीरा तुला कळली नाही
तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही

सात सुरांवर तनमन नाचे
तालावरती मधुबन नाचे
एक अबोली होती फुलली
तिच्याकडे नजर तुझी वळली नाही

धुंद सुगंधी यमुना लहरी
उजळून आली गोकुळ नगरी
जीवन माझे अंधाराचे
काळी काळी रात कधी टळली नाही

उन्हात काया, मनात छाया
कशी समजावू वेडी माया
युग युग सरले, डोळे भरले
आशेची कळी कधी फुलली नाही

 Singer : Asha Bhosle,
Music Director : N. Dutta ,
Movie : Bala Gaaun Kashi Angai (1977)
------------------------------------------------------------------------------------------------------------


.अरे संसार संसार


अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर
आधी हाताला चटके, तवा मिळते भाकर

अरे संसार संसार, खोटा कधी म्हणू नये
राऊळाच्या कळसाला, लोटा कधी म्हणू नये

अरे संसार संसार, नाही रडणं, कुढणं
येडया गळयातला हार, म्हणू नको रे लोढणं

अरे संसार संसार, दोन जीवांचा विचार
देत सुखाला नकार, आणि दुखाःला होकार

------------------------------------------------------------------------------------------------------------

बघ माझी आठवण येते का?


मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?

हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?

वार्‍याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्‍यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?

मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्‍याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?

दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?

मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्‍या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?

यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?

------------------------------------------------------------------------------------------------------------


No comments:

Post a Comment